पुणे -वडगांव- कुडपन -भिमाची काठी -प्रतापगड -पुणे ट्रेक
११ -१२ जुलै २०१५.
प्रस्थान : १० जुलै रात्रौ १०:३० वा. शिवाजीनगर , पुणे
मार्ग : पुणे -ताम्हिनी घाट -पोलादपुर-वडगाव
परतीचा मार्ग :महाबळेश्वर -पुणे
मुख्य प्रवर्तक : श्री अरुण सावंत सर
लीडर्स : सागर अमराळे , सुरज, संजय शेळके आणि इतर
आम्ही : मी म्हणजे मनोज नाईक , सुनील राठोड, निलेश सूर्यवंशी , श्री जोशी ,
स्वयंघोषित लीडर हर्शल कुलकर्णी. नितीश शिंदे
अरुण सावंत सरांबरोबरचा ट्रेक करण्याची मज़ा काही औरच असते. सरांबरोबर मी रतनगढ़-कतराबाई-आजोबा-कलाङगड -सादने घाट ट्रेक केला होता मार्च २०१५ मध्ये . तो माझा पहिलाच ट्रेक होता सावंत सरांसोबतचा. तो एक अप्रतिम ट्रेक झाला होता .
सरांचे वैशिष्ठ म्हणजे प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थितच झाली पहिजे. प्रत्येक कामत ते जातीने लक्ष्य देतात्. मग ते ट्रेकचे नियोजन असो , जेवण तैयार करने असो किंवा परिसराची माहिती देणे असो. आणि हो सर स्वयंपाक फार छान करतात. रतनगड ट्रेकला त्यांनी आम्हाला छान चिकन खावु घातले होते. सरांचे अजून एक वैशिष्ठ म्हणजे लोकांचे वर्गीकरण ते नेहमी ९५ टक्के अन ५ टक्के यामधे करत. उदा. ९५ टक्के लोक ट्रेक करत नाहीत फक्त ५ टक्केच लोक ट्रेक करतात, इत्यादी इत्यादी. कामत कुचराई त्यांना बिलक़ुल चालत नाही. तसे झाले तर मग मात्र काही खैर नाही. त्यांचे लीडरच काय पण ट्रेकर्स सुद्धा बोलनी खातात चूक झाली तर. याचा अनुभव आम्ही (मी ,सुनील आणि निलेश )मागील ट्रेकला घेतला असल्यामुळे यावेळी सावध होतो. सावध होतो म्हणजे सरांपासून थोडे अंतर राखून होतो एवढेच .
 |
| 1. Arun Sawant Sir |
 |
| 2. Fresh Pakoda at Poladpur |
 |
| 3. Nitish (left) and Nilesh enjoying Pakoda |
 |
| 4. Me |
 |
| 5. Breakfast of Batata wada |
 |
| 6. Beautiful temple of Vadgaon village |
 |
| 7. Started trek for Kudpan |
 |
| 8. From left Sunil, me and Nitish |
 |
| 9. Fresh water spring |
 |
| 10. Small waterfall on the way to Kudpan |
 |
| 11. Trekkers enjoying chilling water |
 |
| 12. |
 |
| 13. |
 |
| 14. From Left Shri Joshi, Harshal and Sagar |
 |
| 15.Standing from left Sunil, Harshal, Reshma and Vaibhav, Nitish in Front |
 |
| 16. Foggy landscape |
 |
| 17. |
 |
| 18. |
 |
| 19. |
 |
| 20. |
 |
| 21. |
 |
| 22. Rest point on the way to Pratapgad |
 |
| 23. Pratapgad entrance |
 |
| 24. |
 |
| 25. Statue of Shrimanyogi Shri Shivavaji Maharaj |
हैदराबाद आणि बंगलौर येथून ट्रेकर्स येणार होते त्यामुळे १०० पेक्षा जास्त ट्रेकर्स होते. पुण्यातून आम्ही १२-१३ लोक रात्रि १२ च्या आसपास निघालो. ताम्हिनी घाटत आल्यावर जोरदार पाऊस सुरु झाला आणि दाट धुके असल्यामुळे ड्राइवरला समोरचे काहीही दिसत नव्हते. गाड़ी अगदी हळूहळू चालली होती. साधारण अर्ध्यतासनंतर पाऊस कमी झाला अन रस्ता पण साफ झाला आणि आमचाही जीव भांड्यात पडला . झोप तर येत नव्हती त्यामुळे गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. श्री ने काही कविता ऐकवल्या . पहाटे ४ ला आम्ही पोलादपुरला पोचलो आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेल मधे गरमागरम भजी अन चहा घेतला. थोड़ा वेळाने अरुण सर मुंबईच्या ट्रेकर्स सोबत आम्हाला येवून मिळाले. अर्ध्या तासनंतर आमच्या तीन गाड्या वडगावकड़े निघाल्या . सकाळ झाली तसे आजूबाजूचा निसर्ग दृष्टीस पडला. मोकळा रस्ता, झरे अन हिरवळीने नटलेले डोंगर, अगदीच प्रसन्न वातावरण होते.
सकाळी ६:३० ला आम्ही वडगावला पोचलो. सकाळचे विधि उरकले आणि गावातील मंदिरात गेलो. तेथेच आम्ही नाश्ता केला. यावेळी नाश्त्याला वडापाव आणि चहा होता. सर ट्रेक ला निघण्याच्या आधी नेहमी भरपूर पाणी प्यायला सांगतात- अगदी पोट फुटुस्तोवर पाणी प्या असे सांगतात त्याचे कारण म्हणजे लांब पल्ल्याच्या ट्रेकला जास्त तहान लागत नाही . याचा अनुभव आम्ही मागील ट्रेकला घेतला होता. त्यामुळे साधारण १ लिटर पाणी प्यायलो . ८:४५ वा. आमचा ट्रेक सुरु झाला. अजूनही हैदराबादचे ट्रेकर्स आले नव्ह्ते. ही मंडळी नक्की कोण याची आम्हा सर्वांना उत्सुकता होती. उत्तेकर काका अन कुड़पन गावातील संतोष आमचे गाईड होते. दाट जंगलातून आम्ही मार्ग काढत होतो. अंगावर फारसे ओझे नव्हते कारण बरेचसे आम्ही गाडीत ठेवले होते अन गरजेचेच फक्त बरोबर घेतले होते . अधूनमधून पाऊस पडत होता. एक तासनंतर रस्त्यामधे आम्हाला छोटा धबधबा लागला. मग काय विचारता आम्ही सगळे क्षणात त्या पाण्याखाली गेलो. पाणी बरेच थंड होते पण मजा फार आली भिजताना. फोटो काढले हे सांगायला नको.
दुपारी १२ च्या आसपास आम्ही खिंड पार केली. भूक लागलेली होती त्यामुळे प्रत्तेकाने आपल्या जवळ असलेले खाद्य पदार्थ बाहेर काढले . थोडा वेळ आराम करून आम्ही कुड्पन गावाकडे निघलो. आता चढाई संपलेली होती आणि डोंगर उतरत गावात जायचे होते. दुपारी २ ला आम्ही कुड़पन खुर्द गावात पोचलो. पाऊस पडत असल्यामुळे आम्ही तेथील शाळेच्या पढवीत जेवण केले.
थोडा आराम करून दुपारी ३:३० वा. आम्ही कुड्पण बुद्रुक गावाकडे निघलो. आम्हाला नेण्यासाठी गाडी आलेली पण आम्ही पाई जाण्याचा निर्णय घेतला कारण अंतर जेमतेम ३-४ किलोमीटर होते. चालताना जीवर आले तो भाग वेगळा . रस्त्यावरून जाताना कुडपनचा भव्य दिव्य असा धबधबा दिसत होता. अतिशय रुबाबात डोंगवरील पाणी १००० फूट दरीत कोसळत होते. ४:४५ वा. आम्ही गावात पोचलो. आमची मुक्कामाची सोय गावातील घरात करण्यात आली होती. पुणे आणि मुंबई ट्रेकर्स जेथे झोपणार होती ती जागा म्हणजे दोन घरांचे अंगण होते ज्यावर पत्र्याचे शेड होते त्यामुळे पावसात भिजण्याची शक्यता नव्हती. खाली ताडपत्री अंथरलेली होती . त्यावर आम्ही आमची स्पिपिंग म्याट अंथरली. आमच्या ब्यागा तेथे ठेवून आम्ही जवळ वाहत असनाऱ्या ओढ्यातील पाण्यात फ्रेश झालो . सावंत सर जेवण बनविण्यात व्यस्त होते. रात्रि ८:०० ला आम्ही जेवण केले. चवळी, भाकरी,खीर-पुरणपोळी वरण-भात , पापड, कोशिंबीर असा छान बेत होता . अरुण सर सर्वांना हवा नको ते विचारत होते. आग्रहाने वाढत पण होते. आम्ही एखाद्या समारंभात जेवत आहोत असेच ते वातवरण होते .
जेवण झाल्यावर आम्ही झोपण्याच्या जागी आलो . थोडा वेळाने अरुण सर तेथे आले अन सकाळी ४:४५ वा. वेकअप कॉल दिला जाईल असे सांगितले . थोडा वेळ गप्पा मारून आम्ही झोपलो.
सरांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी सागर न सुरज (सरांचे लीडर्स ) शिट्ट्या वाजवत आले. जोपर्यंत सगळे उठत नाही तो पर्यंत सुरज चे शिट्टी वाजवणे चालूच होते. शरीर थकले होते पण उठण्याशिवाय काही पर्यायच नव्हता . नाहीतर या दोघांच्या शिट्ट्या बंदच झाल्या नसत्या.
सकाळी नाश्त्याला पोहे होते . भरपेट खाल्ले, भरपूर पाणी प्यायलो आणि चहा घेऊन ६:४५ला प्रतापगडाच्या दिशेने कूच केले . हैदराबादची मंडळी सकाळी आम्हाला दृष्टीस पडली . त्यांना पाहून तर आम्हाला धन्य झाल्यासारखेच वाटले . कधी ऊन कधी पाऊस , अधून मधून अंगाला झोंबणारा गार वारा अशा बदलत्या वातावरणात आमच ट्रेक सुरु होता. थोडे उंचावर आल्यावर छान धुके पडले इतके कि अगदी १० फुटावरचे सुद्धा निट दिसत नव्हते . चालून चालून चागलीच भूक लागली होती . निलेश, नितीश, सुनील यांनी भेळ आणली होती . अगदी कांदा, टोमाटो , लिंबू सुद्धा आणले होते . मग मस्त भेळ बनवली आणि ट्रेक करत करत भेळेचा आस्वाद घेतला . १०:३० वा रस्त्यात लागलेल्या रामवरदायिनी मंदिराजवळ थोडा वेळ आराम केला आणि ११:०० वा पुन्हा आमचा ट्रेक सुरु झाला . प्रतापगड समोर दिसत होता . डाव्या बाजूला पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडणारा आंबीनळी चा घात दिसत होता. ४ तासापासून आम्ही चालत होतो शरीर थकले होते, अन वाट गर्द झाडीतून होती अन चालत असताना अचानक समोर प्रतापगडाची माची दिसली . साधारण ११:४५ला आम्ही प्रतापगडाच्या पायथ्याला पोचलो. आजचा ट्रेकही ५ तास झाला . गड चढून तुळजाभवानी आणि श्रीमानयोगी छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे दर्शन घेवून खाली आलो . आजच्या जेवणाची सोय हॉटेल मध्ये होती. भूक तर फारच लागली होती. आजचेही जेवण चांगले होते आणि ताक तर अतिउत्तम होते . थोडा वेळ आराम करून सगळ्यांचा निरोप घेतला आणि आम्ही पुण्याची मंडळी निघलो. रस्त्यात माप्रो च्या आउटलेटमध्ये थोडी खरेदी केली . ७:३० ला आमची गाडी शिवाजीनगरला पोहोचली . ट्रेक करून पहिल्यांदाच एवढ्या लवकर घरी पोचलो होतो .
ek number
ReplyDelete